Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Others

2  

Abasaheb Mhaske

Others

कशाला हवे व्हेलेंटाईन डे ?

कशाला हवे व्हेलेंटाईन डे ?

2 mins
7.1K


यु आर रेडी , आय एम रेडी ,यु आर बटरफ्लाय, आय एम सनशाईन?

नकोच ते कोरडं -, सपक , मिळमिळीत पाश्चात्यांचं अंधानुकरण

नजरेस नजर भिडवून म्हण बिनधास्त... तू मला फार आवडतेस...

मग कशाला हवा कुठला मुहूर्त अन कशाला हवे व्हेलेंटाईन डे? 

असावं अगदी साधं प्रेमाचं गणित ,फक्त म्हणावं तू मला आवडतेस

तिनही म्हणावं तू हि मला खूप - खूप आवडतोस..की बस्स ...

कशाला म्हणावं यु आर वंडरफूल,लव्ह इज गॉड, लव्ह इज लाईफ 

मग कशाला हवा कुठला मुहूर्त अन कशाला हवे व्हेलेंटाईन डे? 

कशाला हवे मोठं मोठे शब्द नि वेगवेगळ्या अवजड परिभाषा?

पक्षी काडी - काडी जमवतो ,सुगरण पक्षींन खोपा विणते का मुहूर्त पाहून?

संथ वाहते कृष्णामाई . घाई न करते गोदामाई ,सृजनाचे प्रतीक धान उगवतेच ना ठायी -ठायी

मग कशाला हवा कुठला मुहूर्त अन कशाला हवे व्हेलेंटाईन डे?

एकमेकांना समजून घ्यावं , ठेच लागता त्याच्या नेत्री टचकन पाणी यावं

तेच असतो समर्पण भाव, अन तेच असत खरं -खरं प्रेम...

तिन म्हणावं तू मला आवडतो, त्यानं म्हणावं तू मला आवडतेस

मग कशाला हवा कुठला मुहूर्त अन कशाला हवे व्हेलेंटाईन डे? 

प्रेम कधी का विचारून होते? प्रेमाची भाषा का कुणालाही कळते? ,

सागरास भरती विचारून येते, काय व्हायचं ते होऊ देत ...

प्रेम कर सीमेवरच्या सैनीकसारखं, अढळ, निश्चल, निधड्या छातीनं

मग कशाला हवा कुठला मुहूर्त अन कशाला हवे व्हेलेंटाईन डे?

नो फादर्स डे, नो मदर्स डे, नो ड्राय डे, नाटकं नुसती

असतात सगळे मनाचेच भ्रम, प्रेमाची भाषा त्यांनाच कळते

ज्याच्याठायी संवेदनशील मन अन दुसऱ्याप्रती अपार प्रेमभाव  

मग कशाला हवा कुठला मुहूर्त अन कशाला हवे व्हेलेंटाईन डे?

सूर्य उगवतो नित्यनेमाने, रात्रही सरते आपल्याच क्रमाने

कळीचाही वय, वेळ ठरलेल असत फुल होण्याचं... कोमेजण्याच

अगदी  तसंच असत प्रेमाचं ... एकमेकांना समजून घ्यावं लोणचे सारखं मुरावं...

मग कशाला हवा कुठला मुहूर्त अन कशाला हवे व्हेलेंटाईन डे?


Rate this content
Log in