Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shital Yadav

Tragedy

3  

Shital Yadav

Tragedy

आक्रोश

आक्रोश

1 min
14.2K


काळोख घनदाट चहूकडे

होई रातकिड्यांची किरकिर


ओसाड पडल्या पाऊलवाटा,

भयान राज्य करे तिमिर


भग्नावशेष विखुरलेले सर्वत्र

श्वासागणिक श्वास होती अधीर


मुस्कटदाबी नित्याचीच हळव्या

मनाची कुणा ना फिकीर


भेदरलेल्या नजरा, हिंसक श्वापदे

लचके तोडण्या असती तयार


प्रश्न एकची घुटमळे मनात,

का? आजही असुरक्षित नार


धूर्त लांडग्यांचे कळप कुदृष्टिने

रोजच झेपावती देहावर


कमजोर समजून 'स्त्री'ला

तुटून पडती भुकिस्त शिरजोर


रक्तपिपासू गिधाड वखवखलेले

अबोध कोवळ्या कळीवर


काळीमा फासती माणुसकीला

विकृत दुराचरणी स्वैर


बेअब्रू करती स्त्री जातीस

विभत्स पसरले जहाल विखार


का? मुक राहुन सहन करावा

नराधमांचा निंद्य व्याभिचार


धिक्कार बदकर्म्यांचा नपुंसक

करुनी आणावे वठणीवर


अद्दल घडवावीच अशा दुष्ट

नीतिभ्रष्टांना लटकवावे फासावर


बस्स !!खूप झाले आता

पाणी कधीचेच गेले डोक्यावर


तत्क्षणीच भस्मसात करुनी

घालावा असुरांवर आवर


अजून किती निर्भया होतील?

सैतानांविरुद्ध कस आपली कंबर


बन तूच मर्दानी, घायाळ वाघीणी

कर पापी शीलभ्रष्टांचा संहार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy