Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mina Shelke

Tragedy

0  

Mina Shelke

Tragedy

अनाथाचे दुःख

अनाथाचे दुःख

1 min
379


छोटी परी लाडाकोडात

मायपित्याच्या छत्राखाली

सुखात वाढताना ,...अचानक

नियतीचा फेऱ्यांनी

गाठलं ऐन तारुण्यात...

आई बापाच्या भांडणात...


संयम सुटलेल्या क्षणानं डाव साधला..

बापाच्या हातून डोळ्यादेखत बळी गेला आईचा...

भर दुपारी,,जणू अंधाराने घेरलं...

स्तब्ध कायमची ....

बाप सैरवैर ,एक मुलगा ,व ती ...


पालनपोषणाची जबाबदारी एकटा अपुरा...

दुसरे लग्नाचा पर्याय अवलंबला ...

स्विकार नाही करता आला ...

कोवळ्या मनाला ...आईची जागा रितीचं

घालमेल बापाचे द्वंद्व मनाचे ...


मुलं की पत्नी ? गुरफटत चालला

प्रचंड तणाव ,आघात मेंदूवर

घुसमट जीवाची शेवटी मृत्यूने

केली सुटका.

अमाप पैसा असूनही पोरकी मुलं ...


नातेवाईक वडिलांच्या विरूद्ध नाही दिली साक्ष

म्हणून दुखावलेले नातेवाईकांनी मुलांची दखल घेणं

दिले सोडून ....

भाऊबहिण अनाथ भरकटलेल्या अवस्थेत

भावाने पैसा हस्तगत करून केला पोबारा...

बहिण एकटीचं भल्या मोठ्या बंगल्यात...


शापित वास्तु सोबतीला...

एकटेपणा आणि एकामागोमाग येणाऱ्या घटनांची

विकलांग अवस्था ...मनस्थिती पूर्ण ढासळली

कधी भकास हसते , कधी रडते

रात्र रात्र किंचाळते , भासात बडबडते

गप्पा सुध्दा मारते नसलेल्या आईसोबत ...

घरभर फिरते मायाममता शोधत...

आर्त साद घालते मदतीसाठी ...

कुणी कुणी ढुंकूनही बघत नाही ...


गच्चीत ऊभी ,आवाज देते येणाऱ्या जाणाऱ्यांना...

आईबाबा कुठे गेले हो ...मला सोडून

प्लीज घरी यायला सांगा न...

अनाथ आहे हो मी ...

दुःख समजून घ्या नं कुणीतरी ...

रडते धाय मोकलून ...


चार भिंतीत गुदमरतोयं जीव

एकटेपणाची समोर शिव ...

ओलांडण्याचं उरले नाही बळ

बघणारा फक्त करतो किव ...

बाकी काहीच नाही ...

असंही अनाथ जिणं न यावं

कुणाच्या वाट्याला ....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy