Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Kadam

Others

4.5  

Prashant Kadam

Others

टप टप बरसत पाऊस आला !!

टप टप बरसत पाऊस आला !!

1 min
13.4K


आला आला सूरू जाहला

मना मनांमध्ये आसुसलेला

ढगा ढगांतूनही साकळलेला

दाट दाट या मेघांमधूनी

टप टप बरसत पाऊस आला !


गार गारवा अपसूक आणूनी

चरा चरांला ऊल्हसित करूनी

लख लख वीजांची वर्दी देऊनी

कड कडाट चौघडा बडवीत आला

टप टप बरसत पाऊस आला !


नदी नद्याही भरू लागले

डोंगरा डोंगरांतून झरे प्रसवले

धब धब्यांतूनही दूध फेसाळले

पाणीच पाणी बहरत आला

टप टप बरसत पाऊस आला !


हिरवी हिरवी सृष्टी झाली

फुला फुलांनी बागही सजली

जागो जागी शेते सळसळली

थेंबा थेंबांतून रोमहर्षत आला

टप टप बरसत पाऊस आला !


किमान आता तरी मंथन व्हावे

मुल्य अमुल्य पाण्याचे कळावे

पाट पाण्याचे बंधारे बांधावे

तळ्या तळ्यांतून साठत आला

टप टप बरसत पाऊस आला !


Rate this content
Log in