Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

UMA PATIL

Others

4  

UMA PATIL

Others

निसर्गाचा जागर

निसर्गाचा जागर

1 min
14.5K


अंधश्रद्धेला देऊ मूठमाती

आले नवे तंत्रज्ञान जगात

विज्ञानाची धरून कास

जगूया आधुनिक युगात... //१//



पाने, फुले, शेती, झाडे

निळाशार अथांग सागर

हिरवळ, पक्षी, प्राणी, जीव

निसर्गाचा करूया जागर... //२//



सुंदर पर्यावरण हेच जीवन

नको कारखान्यांचा धूर

हिरवीगार नटतील शिवारे

दुग्धक्रांतीचा वाहेल पूर... //३//



झाडांना नियमित मिळे पाणी

मिळेल सृष्टीला नवा आकार

हसू, खेळू, नाचू, बागडू

नव्या तंत्रज्ञानाने स्वप्न साकार... //४//



होतील आनंदी येथे सगळेच

भासणार नाही सुखाची उणीव

निसर्गाचा राखू आपण समतोल

नेहमी ठेवू कर्तव्याची जाणीव... //५//



Rate this content
Log in