Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

UMA PATIL

Tragedy

1  

UMA PATIL

Tragedy

प्रेम माझे

प्रेम माझे

1 min
547


प्रेम माझे तुला सांगणे राहिले

हात हातामधे गुंफणे राहिले


श्वास श्वासांत नाही मिसळले कधी

बावऱ्या भावना जाणणे राहिले


वेड होते, गुलाबी नशेचे जरी

गोड शब्दांसही चाखणे राहिले


ना मिळाली मला, रेशमाची मिठी

सोबतीने तुझ्या वाहणे राहिले


दूर गेलास निघुनी कसा तू असा

बोलणे, छेडणे, भेटणे राहिले 



Rate this content
Log in