भीती ( अभंग रचना )
भीती ( अभंग रचना )
भीती
वाटावी का भीती | रात्री अंधारल्या I
येतात सावल्या | अंगावर ॥ १ ॥
असते का खरे I की भास सारेच I
मनात उगाच | धस्स होते || २ ॥
रिकामे ते डोके | सैतानाचे घर I
झळझळे जर I पोशाखाची ॥ ३ ॥
असे ती सावली | खोटीच की खरी I
दाबुन ती धरी | किंकाळीच ॥ ४ ॥
मन ते खंबीर | असेच करावे l
निडर जगावे | रात्रीचेही ॥ ५ ॥