बळी पिकवितो मोती
बळी पिकवितो मोती
1 min
7.4K
काळ्या काळ्या मातिमंदी
शेतकरी करी काम।
जीवा शिवासंगं बघा
शेतामंदी गाळी घाम।।
इवलेसे लावून बी
जीवापाड जपे त्याला।
जणू लेकरु पोटचे
खत घालितो खायाला।।
वाट पाहतो मृगाची
मिटवाया त्याची तृषा।
लावी डोळे मेघाकडे
बरसावे ढग आशा।।
मशागत करितो तो
काळ्या आईची सेवा।
होते प्रसन्न माय ती
खाया देते धान,मेवा।।
हरंहरं सपान हे
तरारते डोळ्यामंदी।
बळी पिकवितो मोती
राहू नये खिन्न कंदी।।