Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

भय...!

भय...!

1 min
201


आपल्या सावलीला घाबरू नका,ती मागे असेल तर तिच्याकडे पाहू नका,ती पुढे असेल तर स्वतःच्या कर्तृत्वाच्या प्रकाशात तिला पुसून टाका.भय सावलीत नसून तिच्या कडे पाहण्याच्या दृष्टीकोनात आहे.दृष्टी बदला जग बदलेल.सकारत्मकता ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे!


भय आणि आपले कर्म


आपले कर्म आपले

जीवन घडवत असते

ते फक्त आपल्यालाच

स्पष्ट दिसत असते...


पुढे पुढे जाताना

कर्म सावली सारखे

पाठो पाठ आपला

इतिहास रचत असते...


आपल्या कर्माची

परिणीती आपले

उद्याचे भविष्य

ठरवत असते....


आपणच आपल्या

सावलीला घाबरत असतो

केव्हा पुढे येईल ती

याचा काही नेम नसतो...


जेंव्हा कर्माचा प्रकाश

मागुन पिच्छा पुरवतो

तेंव्हा सावलीचा राक्षस

पुढे उभे राहतो...


भय त्याचे जीवनात

कधी बाळगायचे नसते

त्या सावलीला कधी

घाबरायचे नसते....


आपल्या कर्माच्या प्रकाशाने

तो सहज नष्ट होतो

आप्पोआपच जीवनाचा

मार्ग सुलभ वाटू लागतो ..!


Rate this content
Log in