रंग होळीचे
रंग होळीचे
1 min
526
नका खेळू तुम्ही
होळीचे बेरंग
शहीद वीरांचा
होई ज्यात भंग ।।
पुसले रे कुंकू
ताईच्या भाळीचे
नकाच उधळू
रंग ते होळीचे ।।
व्हा तुम्ही सामील
सारेच दुःखात
करू नका होळी
साजरी रंगात ।।
करु नका सण
रंगाचा साजरा
टेकवून माथा
करुया मुजरा ।।
होळीचा आनंद
ठेवा जरा बाकी
कळूद्या तुमची
जगाला लायकी ।।