फुलत रहा
फुलत रहा
गतवर्षाला निरोप देता
नववर्षामध्ये पाऊल पडता
सदाफुलीसम प्रसन्नतेने
फुलत रहा, तू खुलत रहा ।।
नवा दिवस तो नववर्षाचा
नवी चेतना नवी प्रेरणा
घेउनी आला, स्विकारी त्याला
फुलत रहा, तू खुलत रहा ।।
मार्ग चालता आयुष्याचा
कधी न पाऊल कुठे अडावे
संकटांनाही कुरवाळून तू
फुलत रहा, तू खुलत रहा ।।
स्पर्श तुझ्या पायाशी करता
काट्यांनीही विचार करावा
'रक्षण करीन मी' तुला म्हणावे
फुलत रहा, तू खुलत रहा ।।
दुःखांचीही फुले बनावी
वायूसवे तव कीर्ती व्हावी
गर्जव्यात या दिशा दहाही
फुलत रहा, तू खुलत रहा ।।
फुलत रहा, तू खुलत रहा
सुखासवे तू झुलत रहा ।।