बालपण
बालपण
1 min
162
"बालपण"
अवखळ हे बालपण
खळखळ वाही झऱ्याप्रमाणे।
शुध्द हे बालमन।
निर्मल राही झऱ्याप्रमाणे।
खेळ हा लपंडाव, शिवाशीवी।
गंमत किती भारी वाटे।
उनाड वारे घुमी जसे ।
शीळ वाजवीत गाणे।
मनसोक्त आनंद जलतरणाचा।
सानिध्य निसर्गाचे हवे वाटे।
मुक्त हे जीवन स्वछंदी।
यावे प्रत्येकाच्या वाटे।