Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Tragedy

3  

Pandit Warade

Tragedy

संसार हा सुखाचा

संसार हा सुखाचा

1 min
7.3K


    हा खेळ नशिबाचा, हा ऊन पावसाचा ।

कधी भासतो दुःखाचा, संसार हा सुखाचा ।।

हळदीचे अंग माझे, हिरवा चुडा मी ल्याले ।

करण्यास मी निघाले, संसार हा सुखाचा ।।

स्वप्ने तऱ्हेतऱ्हेची, घेऊन ऊरी आले ।

साकारण्या निघाले, संसार हा सुखाचा ।।

कैसे ते स्वप्न विरले, झोपी नशीब गेले ।

थळाथळात चाले, संसार हा सुखाचा ।।

रक्ताळले ते पाय, मेंदीचे हात चिरले ।

जोरात तरी चाले, संसार हा सुखाचा ।।

अंथरूण चिपाटांचे, ढेकूळ ते उशाला ।

आकाश पांघराया संसार हा सुखाचा ।।

भांडीकुंडी नको ती, ना वस्र आभूषणे ही ।

चिंता उगी कशाला? संसार हा सुखाचा ।।

राहणे न याच ठायी, जाणे दुज्या ठिकाणी ।

घरकूल ते कशाला? संसार हा सुखाचा ।।

पतीप्रेम सोबतीला हवे काय मग जीवाला ।

करिते मी " पंडिता"चा संसार हा सुखाचा ।।


Rate this content
Log in