Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mangesh Medhi

Others

3  

Mangesh Medhi

Others

संकल्प !

संकल्प !

1 min
7.2K


साधुया का नवा बदल

करुया का थोडे परिवर्तन

करुया का पैशाचे जगातून उच्चाटन


कधी काळी होता ओलावा माणुसकीचा

मानत होतो देवा परी अतिथीला

काय कसं बरं हाय का ?

या बसा गुळ पाणी घ्या

अन् आता काय रं बा हिकड कसा

काय काम काढलं ? तुझं की माझं ?

करुया का पैशाचे जगातून उच्चाटन


देवासाठी होता गाठीचा पैसा

तोच होऊन बसला देव आजचा

त्याच्या पुढं झुकती भले थोरले

कालचा सोम्या रात्रीत राव !

त्या मागे धावती छटूस्तोवर दम

हाती लागला तर उठतो कोण ?

करुया का पैशाचे जगातून उच्चाटन


जर कधी असं झालं तर !

होतील का सारे नि:श्चिंत ?

नैसर्गिक जगण्यातला साधेल का आनंद ?

आपणच बनविला आपल्याच करीता

हरवून बसलो स्वत:स ही त्याच्या करीता

करुया का पैशाचे जगातून उच्चाटन


समजेना मनास या, प्रश्न अनुत्तरीत हा !

पैसा माणसासाठी का,...…...

माणूस पैशासाठी, माणूस पैशासाठी ?

साधुया का नवा बदल

करुया का थोडे परिवर्तन

करुया का पैशाचे जगातून उच्चाटन...


Rate this content
Log in