Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Rajesh Sabale

Abstract Others

0.8  

Rajesh Sabale

Abstract Others

ऊन-पाऊस

ऊन-पाऊस

1 min
1.3K


ऊन-पावसाचा आता, कोण भरवसा देई|

वाऱ्या-वादळात येते सर पावसाची बाई||

 

कधी होई वाऱ्या संग, ढोल ताशांचा गजर|

वीज कडाडून करी, मेघ अंबरी जागर||

वादळात मोडून गेली, सारी झाड-झुड घर|

नाही पाखरा निवारा, नाही माणसाला घर||

 

कस आभाळ फाटलं, तस मन हि विटलं |

भर दुपारी उन्हात, येण पावसाच झालं||

वाऱ्या-पावसात लई, गारांनी झोडलं|

गाई-गुरा वासरांना, कोणी खटका विकलं ||

 

काय त्याची लीला सारा नियतीचा खेळ|

ज्यान दिल त्यांनी नेल, अशी आली येळ||

काय होत माझ्या पाशी, काय कुठून आणला|

येन अवकाळी पावसाच, आता म्हणू या चांगलं ||


Rate this content
Log in