वेदनेचा गाव
वेदनेचा गाव
1 min
7.0K
वेदनेचा हाच माझा गाव आहे
यातनेने कोरलेले नाव आहे
सांजवेळी अंगणी या पावसाचा
कोपण्याचा मांडलेला डाव आहे
आरशाला काय ठावे रूप माझे
चेहऱ्याला अंतरीचा भाव आहे
भास होतो गंध येतो वादळाचा
कातळाची त्याकडे ही धाव आहे
का धरा ती घेत जाते खोल ठसे
अंबराच्या अंतरीही घाव आहे
वृत्त - मंजुघोषा
लगावली- गालगागा गालगागा गालगागा