नागपंचमी
नागपंचमी
1 min
1.2K
आला श्रावण घेऊनि सणवार आनंद फार
पहिला सण नागपंचमी आला
पुजू नागाला लाहया फुटाणे दावू नैवेद्य गोड
दुधाची जोड़
झोका झाडाला बाई उंच बांधला
खेळ रंगला सखया साऱ्या जमल्या हो अंगणी माहेरवाशिणी धरूनि फेर नाचुनि बागडुनि गातात गाणी
भूलोबा देव सजला बाई छान ठेवूया मान
करु जतन ही आपली संस्कृती माय माऊली
सांगति सण जपा पर्यावरण
करा रक्षण व्हा सर्पमित्र जाणा जाती अनेक साप