माझ्या बालपणी
माझ्या बालपणी
1 min
6.9K
आई उठायची पहाटेच्या वेळी
करी सारवण नि काढी रांगोळी.
ऐकू येई कधी वासुदेव गान
गोड वाटे भुपाळीची लय,तान.
चिऊ काऊचे घरटे झाडावर
पाणी भरायला बाया आडावर.
पारंबीचा झुला माझ्या बालपणी
खेळ भातुकलीचा रंगे अंगणी.
गोष्टी आजी-आजोबाच्या खुप भारी
नातवंडे म्हणायाची श्लोक सारी.
बालपण जणू सोहळा अनोखा
मोठे झाल्यावर प्रत्येक पारखा.