Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Trupti Naware

Others

4  

Trupti Naware

Others

थंडगार खिडकीच्या आडोशात

थंडगार खिडकीच्या आडोशात

1 min
21K


तुझ्याजागी तू आहेस

माझ्याजागी मी

मृगपावसाची सुरवात झालीय

मग भिजायचं कुणी ?

वाफाळलेला चहाचा कप

थंडगार खिडकीच्या आडोशात

मी प्रत्येक घोटात...विचारमूर्ती

तू अजूनही तापलेल्या ग्रीष्मात

पाठवू का आसवं आकाशाची

तुझ्यासाठी ...

ओंजळीच्या भरात

माझ्या कपातलं वादळ

अजुनही उसळतयं

थंडगार खिडकीच्या आडोशात

तुझ्याजागी तू आहेस

माझ्याजागी मी

प्रवाह वाहुन गेलाय अंगणातला

होडी बनवायची कुणी ?

माझ्या श्वासाची प्रत्येक लय

बेसूर होते ..

वीज गेलेल्या अंधारात

गाणं ही गुणगुणताना चुकतयं

मनाची पानं भलत्याच विचारात

काढु का चिञ रंगीत इंद्रधनुचे?

तुझ्यासारखेच हरवेल ते

पावसानंतरच्या हिरव्या विरहात

तुझ्याजागी तू आहेस

माझ्याजागी मी

पाऊस तर बरसणार

दरवर्षीच्याच श्रावणात

उत्कट व्यथा ओलीचिंब होते

भिजते शहारते

वाफाळलेला चहाचा कप

पुन्हा घेते

थंडगार खिडकीच्या आडोशात

तुझ्याजागी तू आहेस .......

माझ्याजागी मी .........!


Rate this content
Log in