*चतूर लांडगा*
*चतूर लांडगा*
चतूर लांडग्याने एक थाटली
जंगलात चौपाटी खास
लावली पाटी खाद्यपदार्थांची
आॅर्डरप्रमाणे पदार्थ मिळतील खास....//१//
भजी गरम,बटाटा वडा
पाणीपुरी,भेळ, मिसळ
चटकदार, चवदार
चौपाटीवर गर्दी अस फार//२//
आयते पदार्थ खाऊन
प्राण्यांचे वाढले वजन
त्रास सुरू झाला
बी,पी. वाढला//३//
त्रास होऊ लागला वजनाचा
विचार करू लागले योगाचा
ठरवले सर्व प्राण्यांनी
योगा करू निशीदिनी//४//
चतूर लांडग्याने ऐकले
गल्यावरच बसून
एक प्लॅन आखला
चौपटी बंद करून
योगाचा क्लास काढला//५//