पाऊसधारा
पाऊसधारा
मनसोक्त बरसतात पाऊसधारा
चिंब,चिंब भिजली वसुंधरा
गुज कानी काल सांगून गेला
अवखळ, अल्लड रानवारा ....
पारिजातकाचा गंध पसरला
पृथ्वीवर फुलांनी सडा शिंपडला
पाऊसधारा येती झराझरा
वसुंधरेवर पडती टपोर्या गारा..
वसुंधरा सजली, चिंब झाली
पाऊसधारात मुक्याने भिजली
हिरवा शालू पांघरली
दवबिंदूने शहारली....