Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

UMA PATIL

Romance

3  

UMA PATIL

Romance

माझे पहिले प्रेम

माझे पहिले प्रेम

1 min
2.7K


अवचित घडले काही

माझा मी न राहिलो

ती काळजात भिडली

मी ही तिचा जाहलो..... ||१||


येता ती माझ्या समीप

पूर्ण गुंतलो तिच्यात

थोडेच उरले अंतर

तिच्यात नि माझ्यात..... ||२||


बोलली असे काही

उडूनी गेले होश

सहवास तिचा घडता

जीवनी झालो मदहोश..... ||३||


अंगी ती बिलगता

सुचती ना मला अक्षरे

कोरली समुद्री वाळूवर

आमच्या प्रेमाची प्रेमाक्षरे..... ||४||


येता मिलनाची घडी

मनात वाढे हूरहूर

एकांताच्या या क्षणांचा

जीवनी आनंद भरपूर..... ||५||


तीच माझे पहिले प्रेम

तीच ह्रदयाचा हुंकार

ओबडधोबड जीवनाला

तिच्यामुळे मिळे आकार..... ||६||


बीज आमच्या प्रेमाचा

तिच्या कुशीतून अंकुरला

सोबतीत तिच्या माझा

सुखी संसार फुलला..... ||७||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance