Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Abasaheb Mhaske

Others

4  

Abasaheb Mhaske

Others

संदेश

संदेश

1 min
13.7K


घालमेल झाडा - झुडपांची , पशुपक्षाची समजून घेणार का कुणी ?

समतोलही बिघडू न द्यावा निसर्गाचा अन शोधावी गुपिते सर्वानी ...

का खदखदतो लाव्हारस , का होते अस्वस्थ धरा ? का येते त्सुनामी ?

येते आभाळ भरून अन देऊन जाते का हुलकावणी ? वणवा पेटतो मनात... 

ऋतुचक्र निसर्गाचे अबाधित राहावे , जीवजंतू ,किट्ककृमी सुखी व्हावे ..

हिरवं स्वप्न बळीराजाचं करपत , होतो धरणीकंप त्याच्या हृदयात नि पाणी गोठत डोळ्यात   

आभाळाची अस्वस्थता आणि लाव्हारसाची उद्विग्नता घेऊन तो पेरतो पुन्हा - पुन्हा ..

सुटेल कधी का हे दृष्टचक्र बळीराजाच्या  भोवतालचं .. अन होईल का खेडी स्वयंपूर्ण पुन्हा ?

बेसुमार वृक्षतोड नको की ,खनिज संपत्तीची तस्करी नको , नको प्राणी , पक्षांची शिकार 

झाडे लावा , झाडे वाढवा , पाणी आडवा , पाणी जिरवा राखण्या समतोल पर्यावरणाचा

ऱ्हास नको नैसर्गिक संपत्तीचा , राखून ठेवूया पुढच्या पिढीस हा अनमोल ठेवा ... 

फक्त सांगणे उत्कर्ष होण्या समग्र मानवजातीचा... संदेश एवढा त्यांच्यापर्यंत पोहचावा 


Rate this content
Log in