Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Rajesh Sabale

Tragedy

3  

Rajesh Sabale

Tragedy

ऊन-पाऊस

ऊन-पाऊस

1 min
337


ऊन-पावसाचा आता, कोण भरवसा देई।

वाऱ्या-वादळात येते सर पावसाची बाई||


कधी होई वाऱ्या संग, ढोल ताशांचा गजर|

वीज कडाडून करी, मेघ अंबरी जागर||

वादळात मोडून गेली, सारी झाड-झुड घर|

नाही पाखरा निवारा, नाही माणसाला घर||


कस आभाळ फाटलं, तस मन हि विटल|

भर दुपारी उन्हात, येण पावसाच झाल||

वाऱ्या-पावसात लई, गारांनी झोडल|

गाई-गुरा वासरांना, कोणी खटका विकल||


काय त्याची लीला सारा नियतीचा खेळ|

ज्यान दिल त्यांनी नेल, अशी आली येळ||

काय होत माझ्या पाशी, काय कुठून आणला|

अन अवकाळी पावसाच, आता म्हणू या चांगल||


Rate this content
Log in