नवस
नवस
सारं भकास भकास
गाव झालया उदास
लागे मिरगाची आस
कसा पडेना पाऊस --- ||१||
रान जिवाचं करोनी
दिनरात हा राबतो
वर पाहता पाहता
कसा घामाघूम होतो---||२||
बोजा कर्जाचा करूनी
काळया आईला माखतो
पोटी धरुन सपान
उभं आयूष्य जगतो---||३||
आलं आभाळ भरुन
गेलं रानामंदी गाव
कसा ओसंडून वाहे
मनी आनंदाचा भाव---||४||
पिळ देऊनी पोटाला
दाणा दाणा रे पेरला
तुच आहे आधाराला
देवा पाव नवसाला---||५||