माहेरच्या अंगणी
माहेरच्या अंगणी
माहेरच्या अंगणी
बाई शेणाचा सडा
आम्रवृक्ष खडा
बाजूलाच.
रंग उधळून
करिते स्वागत रंगावली
मोहविते गुलबकावली
बहरुन.
वृंदावनी तुळस
डोलते थाटात अशी
माहेरवाशिन जशी
मुक्त.
टिपतात पक्षी
अंगणात दाने दुणे
नसे उणे
माहेरी.
माहेरच्या अंगणी
झूलती झाडाला झोपाळे
घेतात हिंदोळे
माहेरवाशिनी.