एक कविता
एक कविता
1 min
6.7K
काय सांगायचे कसे सांगायचे?
घुटमळते मन सांगण्यासाठी
शोधात निघते ते शब्दांच्या
मदत करिती जे सांगण्यासाठी!
कविता एक सखी जिवलग
सारखी मनात डोकावते
अस्वथ मनास समजावते
कविता बळ देते जगण्यासाठी!
कविता देते जाणीव एक नवी
माणूस असुदे मनात नेहमी
कर विचार माणसांचा तू रे
तुझी कविता असूदे त्याच्यासाठी!
-------------------------------------------------------------