मोगरा फुलला आज अंगणात
मोगरा फुलला आज अंगणात
1 min
7.0K
मोगरा फुलला आज अंगणात
मेघ बरसला श्रावणात
प्रीतीचे मंजुळ गाणे गाते मी
चिंब भिजूनि मनात
सजनाची लागता चाहूल
वेशीवर अडले पाउल
पैजनांची रुणझुण नेऊ लागली उंबऱ्यात
मोगरा फुलला आज अंगणात
तुझ्या भेटीची मनी हुरहूर
समोर येता अंगी उठले काहूर
हर्ष झाला मनी बहू अन
मिलनाचे स्वर उमटले गगनात
मोगरा फुलला आज अंगणात