Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shila Ambhure

Others

2  

Shila Ambhure

Others

साद वटवृक्षाची

साद वटवृक्षाची

1 min
975


वळणावर झाड

उभे वडाचे एक

लोटलीत कैक

वर्षे


वटवृक्ष वयोवृद्ध

विस्तार जयाचा खुप

विलोभनिय रूप

डेरेदार


वरदान वसुंधरेचे

गर्द हिरवी काया

देतसे छाया

वाटसरुंस


घरकुल पाखरांचे

लपवितो कसे फांद्यांवरी

शोभतो पहारेकरी

वनदेवीचा


वड देतो

मेवा फळांचा गोड

नसे तोड

त्याला


वटवृक्ष तोच

उभा आज विषण्ण

मनःस्थिति खिन्न

बहु


वृक्ष निस्तेज

शाखा नि पर्णविरहित

नव्हते हरित

केविलवाणे


दुष्ट मानवाची

सांगू लागला कथा

मांडितो मनोव्यथा

व्याकुळ


गाळुनी पाने

घालितो मनुजास 'साद'

सोडावास नाद

वृक्षतोडीचा


सुसह्य जीवना

कर तू वृक्षारोपण

संगोपन ,संवर्धन

सर्वकाळ


हसेल निसर्ग

वाहतील आनंदाचे वारे

होतील सारे

सुखी.


Rate this content
Log in