सामर्थ्य शब्दांचे
सामर्थ्य शब्दांचे
1 min
1.7K
जोरकस शब्द
तिरकस भावना
आवाज आतला
लेखणीत ओतला …!
टणत्कार शब्दांचे
हुंकार विचारांचे
घणाघाती शब्द
तीव्र फटक्यांचे ….!
शब्द आसुडापरी
शब्द चाबकापरी
नि:शब्द वार मग
मनी उमटती ……!
शब्द सामर्थ्य
काय सांगावे
इतिहास शब्दांचा
शब्दातीत हो ………!