Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

झाली उदंड लेकुरे

झाली उदंड लेकुरे

1 min
13.2K


झाली उदंड लेकुरे

होई धरतीला भार

घाला आवर जरासा

ठेवा छोटा परिवार


आम्ही दोघेजण असू

तसे दोघेच आमचे

तिथे नांदे सुख सदा

राहे संबंध प्रेमाचे


'अति तेथे माती' मंत्र

नित्य असावा ध्यानात

नको संतती जास्तीची

ठेवा तिला आटोक्यात


वाढलेली लोकसंख्या

मूळ साऱ्या समस्यांचे

होत आहे अतोनात

नुकसान निसर्गाचे


अन्न, वस्त्र, घरदार

साऱ्यांचाच तुटवडा

होत आहे छोट्या छोट्या

तुकड्यात बटवाडा


लोकसंख्या भस्मासूर

वाढलाय भरपूर

जरा मनावर घेऊ

ठेऊ छोटा परिवार


सारे मिळून घेऊया

सुखी कुटुंबाचा वसा

प्रेम जिव्हाळा वाढवू

देऊ सुखाचा दिलासा


Rate this content
Log in