सुख प्रितीचे !!
सुख प्रितीचे !!
आज सगळे सुख हे लाभले तुझ्यामुळे,
परिकथेसम सर्व जाहले, तुझ्यामुळे
तुझ्या प्रितीने जीवन हे फुलले,
मोहरले, मन अधीर झाले,
हृदय कसे सहज गुंतले, तुझ्यामुळे,
तुझ्यामुळे, तुझ्यामुळे !
तुझ्या हातांनी घर हे सजले
बहरले, अंगण खुलू लागले,
घरास कसे घरपण आले, तुझ्यामुळे,
तुझ्यामुळे, तुझ्यामुळे !
तुझ्या स्वरांनी शब्द हे गुंफले,
सप्त स्वर झंकारले, गुंजले,
सूरांत कसे सूर मिसळले, तुझ्यामुळे,
तुझ्यामुळे, तुझ्यामुळे !
तुझ्या मैत्रीने दैव ही खुलले
आनंदी मन पुलकीत झाले,
भाग्य कसे अलुवार उजळले, तुझ्यामुळे,
तुझ्यामुळे, तुझ्यामुळे !