बदल
बदल
माझ्या सावलीतही तू तेव्हा
चिंब चिंब नाहायची
माझ्या एका नजरेने
अवचित भान हरवायची...
आजही माझी सावली
माझा पाठलाग करते
अन् नजरही तशीच
बेजुबान बनून फिरते...
फक्त तू चिंब होण्यास
दुसरी सावली धरलीयेस
आणि नजरेची भावना
दुसऱ्याच्या डोळ्यात शोधतीयेस...