तू न मला पहिले
तू न मला पहिले
तू न मला पहिले
मी न तुला पहिले
सर्वस्व वाहिले, तरीही ...
तू न मला जाणिले
मी न तुला जाणिले
का मग जडले प्रेम हे ....
नेत्री तुझ्या हसावे
मनी तुझ्या वसावे
जवळी तुझ्या असावे
सर्वार्थाने ....
तू नसताना ,मन माझे वेडेपिसे
खिन्न,उदास, जिणे होई नकोसे
स्मृती शेष भाव डोळ्यांमधूनि पाझरते
वेळी- अवेळी ...
तू नसतानाही कधी स्मरते
आठवणींचा ठिपका होते
का उगाच भाव खाऊन जाते
स्वप्नात येऊनि ....
जाणता - अजाणता मज छळते
क्षणात इथे - तिथे अवतरते
नसा - नसात भिनते ...
धमन्या होऊनि ..