कविता- प्रिय मित्रांनो
कविता- प्रिय मित्रांनो
1 min
14.1K
लेखक - कवींना माध्यम हवे असते
लेखन वाचकांच्या पर्यंत न्यायचे असते
असे छान माध्यम मिळाले की
लेखन आपोआप बहरत असते ...
इथे वाचक-मित्र- मैत्रिणी भेटले
लेखक कवी मी
आणि वाचक तुम्ही
सूर छान किती जुळले
भरभरून प्रतिसाद मिळतो तुमचा
नव्या लेखनास प्रेरणा मिळते
असेच सोबत तुम्ही असावे
लेखन माझे असेच बहरावे...
रोज नवे मित्र-मैत्रिणी
परिवारात माझ्या येती
स्वागत आहे तुमचे प्रिय हो
तुमची मैत्री हीच माझी श्रीमंती ..
तुमच्या वाचक - प्रतिसादास ,
हीच प्रेमाची पोंच पावती देतो ...
धन्यवाद ..धन्यवाद ..धन्यवाद