शोध शोधण्याचा
शोध शोधण्याचा
1 min
6.7K
शोधण्याच्या मर्यादेपलीकडे
शोधत शोधत
शोधण्याची वाट
शोधूनही चंद्रापलीकडची
शोधत काहीतरी
चालणारी लाट
खळाळणार्या हास्यापरी
ओघळणार्या अश्रुपरी
शोध एका भावनेचा
शोधत जाणारी
शोधक पहाट
एका नजरेची प्रतिक्षाही
शब्दा शब्दाची समीक्षाही
शोधत असते एकच साथ
अनंत जरी हा
शोध शोधण्याचा
शोधण्याच्या मर्यादेपलीकडे
शोधत असतो....
शोधणारा हात..!