Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Romance

2  

Abasaheb Mhaske

Romance

तेही तुला सांगायलाच हवं ?

तेही तुला सांगायलाच हवं ?

1 min
7.1K


तेही तुला सांगायलाच हवं ?

मनातलं वादळ, आठवणींचं वारूळ

जीवाची घालमेल, तू नसण्याची सल

तुझ्या माझ्या प्रेमाची अयशस्वी वाटचाल


तेही तुला सांगायलाच हवं ?

तुझा तो हवाहवासा स्पर्श, मनीचा हर्ष

तू येण्याची अनामिक चाहुल, मनीची हुरहुर

जीवघेणा एकांत आणि आणखीही बरंच काही...


तेही तुला सांगायलाच हवं ?

आपलं प्रेम किती ? कसं शब्दातीत

भावनांचं आक्रंदन, हृदयाचं स्पंदन

अस्ताव्यस्त मन ... रात्र रात्र जागणं झालेलं...


तेही तुला सांगायलाच हवं ?

भूतकाळ हरवलेलं, मनात साठवलेलं

बरंच काही नकोसं अनाहूत, अमंगल

प्रेम तुझं माझं वेगळेपण... असलेलं, नसलेलं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance