Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Meenakshi Kilawat

Classics

4.3  

Meenakshi Kilawat

Classics

माझा कास्तकार बाप

माझा कास्तकार बाप

1 min
282


 माझा कास्तकार बाप

रातदिस राबे वावरा

दिसा वखरनी करे

रातच्याले जागली करे||

कास्तकार बाप माझा

दिसतो चिंतेत हे खर हाये

पण कधी म्हणे थोडी का राहेना

बर झाल मले वावर त हाये||

अल्पभूधारक आहो म्हणुनसन 

सरकारी मदत पण भेटते

कर्ज बिर्जाचीबी कंदीमंदी साह्यरा होते

नाही म्हणल तरी जरासी सपसिढीबी भेटते||

मंधातले दलाल भाय तरास देते

त्यायिले कदीबदी घाला लागते चारा

आजकाल दिस महागाईचे आले

कर्ज उचल्याशिवाय विलाज नसे न्यारा||

तरीबी माह्य म्हणन हाये ताने

नौकरी करण्यापरिस वावर बर हाय

आपण आपल्या मर्जीचे मालक हावो

कव्हा नाही जाव वाटल अडत नाही काय||

आजकाल शिकूनबी नोकरी 

काही लागत नाही ताने 

सोताचा धंदा केला तर 

राजापरीस राह्यने||

शेती आपली माय सारखी

थे काही अंगावर ठेवत नाही ताने

काही ना काही कुरपा होतेच

तव्हाच का आपण समदे रायतो आनंदाने|| 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics