ही वाट दूर जाते ...
ही वाट दूर जाते ...
ही वाट दूर जाते
विसरू तुला पाहते
तर कधी तुज स्मरते
सांग ना रे भेटशील का पुन्हा ?
आठवते ते भावविभोर डोळे
निरोपाचे ते परमोच्च सोहळे
क्षण ते केंव्हाच ओघळले
सांग ना रे आठवशील का पुन्हा ?
शोधते तुज पावलांचे ठसे
जगते तुजशिवाय कसेबसे
उदास मन होता वेडेपिसे
सांग ना रे जगावे तरी कसे ?
आस तुझी मनी नजर भिरभिरते
विरह नयनी मज पाझरतो
सानिध्यातील क्षण ते हळवे
सांग ना रे विसरू तरी कसे ?
गेलास तू सोडूनि अचानक
अर्ध्यावरती डाव मोडुनी
येशील का रे तू परतुनी पुन्हा ?
की होशील द्वारकाधीश राणा