श्रावण बरसला
श्रावण बरसला
ढगांचा गडगडाट
विजेचा कडकडाट
गारठलेल्या संध्याकाळी
हिरवी चिंब पायवाट
कोण धडपडतोय
कोण कोणाला सावरतोय
कोण सखीचा हात हातात घेत
मनातल्या मनात बावरतो
बरसणाऱ्या धारांमध्ये
कोण शोधतोय हरवलेले क्षण
कोणी पावसात रडून हलके करतोय
आपले मन