Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
वास्तव' वलयांकित जाणिवांचे...
वास्तव' वलयांकित जाणिवांचे...
★★★★★

© Raosaheb Jadhav

Others

1 Minutes   183    4


Content Ranking


सश्रद्ध मनाच्या कप्प्यातून

पाझरणारे रंग जमू लागताच

फिरू लागतो कुंचला कल्पनेचा

आणि होते साकार मूर्ती तुझी

आलिंगत शब्दांना...


काढत बोळस, रोखून श्वास

असतात आतूर कान अन कान

पहिल्या ध्वनीसाठी जगाच्या;

जो असतो निघणार

मुखातून तुझ्याच

सोडवत गुंता साशंकतेचा...


आणि कधी कधी

कुरवाळत कोवळेपण काळजाचे

ठेवली जातात मांडून गणितेही

स्पर्शाची हळुवार,

जपण्यासाठी जन्मानंतरचे जगलेपण

तुझे-

रांगण्यापासून रंगण्यापर्यंत...


कधी अल्पाक्षरी मोरपीस

तर कधी अख्खा मोरही

असतेस तू -

ताल, सूर अन लय सांभाळत

नाचणारी

भरल्या शिवारी

छंदात आपल्याच...


कधी पाऊस बरसणारा

तर खड्डाही असतेस कधी

सावरणारी झिरपत्या पावसाला

जपत खाणाखुणा

पाठमोऱ्या पावसाच्या...


तू असतेस,

अंतरी ओथंबून थांबून असलेल्या

दोन थेंबांची साक्षीदार...

तर कधी ओवी ओली

आसवांना पदरात सामावून घेणारी...

किंवा अभंगही,

नाचवणारी अर्थ संदर्भाचे

मस्तकावर वर्तमानाच्या

जागवत जगण्याला

'फोडत बुडबुडे बुडवणारांचे'...


किंवा कळी चारोळीची

डोकावणारी वेणीतून

त्रिवेणीच्या,

मिरवत माथी बंधनाला...


खरे तर,

तू असतेस दीर्घ कविता

जगणे व्यापून उरणारी

करत श्वास मोकळा

मुक्ततेच्या मार्गातला,

....निःश्वासाची दीर्घ हिम्मतही

असते तूच...


आणि मी मात्र-

करू पाहतोय तुला उगाचच

हवाली गृहीतकांच्या

जेव्हा स्वीकारू पाहतात अर्थ;

शरीर शब्दांचे

-ढकलत स्वतःला

अक्षरवाङमयाच्या समीक्षाप्रवाहात-

बांधत माथी 'वास्तव'-

वलयांकित जाणिवांचे...

पहिले प्रेम घेत जाताना

आकार

मी मात्र आकारहीन...


- रावसाहेब जाधव

9422321596

वास्तव' वलयांकित जाणिवांचे...

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..