Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vijay Sanap

Inspirational

1.1  

Vijay Sanap

Inspirational

निसर्ग

निसर्ग

1 min
1.5K



।। निसर्ग ।।


उन्हाच्या त्या झळा / दिसे काळ्यारानी

माय अनवाणी / हिंडतसे ।।१।।


मिरगाची छाया / पडे रानोमाळ

नको हा दुष्काळ / आता तरी ।।२।।


इंद्रधनु नभी / बांधले तोरण

शेतात पेरण / चालतसे ।।३।।


हिरव्या झाडीत / निसर्ग फुलला

पाहून खुलला / जीव माझा ।।४।।


श्रावणाच्या सरी / पडे थेंब थेंब

भिजवतो कोंब / काळ्या रानी ।।५।।


निसर्ग सुंदर / शोभतो डोंगरी

बापाची उभारी / मनामधी ।।६।।


डोंगर झाडीत / अंधार पडला

निसर्ग झाकला / काळोखाने।।७।।


निसर्ग फुलवी / बळीचा तो मळा

रानात कोकीळा / गीत गाई ।।८।।


निळे निळे मेघ / दाटले आकाशी

मनामध्ये खुशी / होत असे ।।९।।


मोर नाचे रानी / करुन पिसारा

निसर्ग हा सारा / फुलवीत ।।१०।।


Rate this content
Log in