Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

गोविंद ठोंबरे

Inspirational

2  

गोविंद ठोंबरे

Inspirational

कधी कधी...

कधी कधी...

1 min
7.1K


काही सांगायचं नसतं

काही बोलायचं नसतं

झाकलेल्या गोष्टीला

कधी कधी जिरवायचं असतं..


काही लपवायचं असतं

काही दडवायचं असतं

आतल्या गाठीला

कधी कधी उघडायचं नसतं..


काही विसरायचं नसतं

काही सोडायचं नसतं

रुतलेल्या काळीज गोष्टींना

कधी कधी जगवायचं असतं..


काही हरवायचं असतं

काही गमवायचं असतं

गेलेल्या क्षणांना

कधी कधी विचारायचं नसतं..


काही घ्यायचं नसतं

काही द्यायचं नसतं

आपल्याशा इच्छांना

कधी कधी वाटायचं असतं..


काही सजवायचं असतं

काही फुलवायचं असतं

बहरलेल्या आयुष्याला

कधी कधी माझंच म्हणायचं नसतं..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational