Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Meenakshi Kilawat

Inspirational

3  

Meenakshi Kilawat

Inspirational

कविताजीवन एक रंगमंच

कविताजीवन एक रंगमंच

1 min
650


जीवन एक रंगमंच आहे

इथे भूमिकाच होलसोल

अगणित रंग शलाकांच्या

जाळ्यात होतसे घालमेल......!!


जगण्याकरीता आयुष्यात

त्याग तपस्या करावी लागते

समाधानाचं बी रूजवूनी

आनंदी आयुष्य फुलवावे लागते...!!


माझा मीपणाचा अभिमान

कधीही कामाला येत नाही

श्रेयाला कितीही जपले तरी

सोबतिला काही तो राहात नाही...!!


रंगमंचवरची ही सुंदर भेट

त्याला सत्कर्मात फुलवायचे

आपल्या मेहनतीचे फळ

मिळेल घाऊक भावाचे........!!


आयुष्यावर बोलायचे काही

या सप्तरंगात नित्य नाहायचे

दुनिया आहे एक अजब रंगमंच

मिळूनमिसळून जगायचे........!!


जन्म घेतो जन्मदिवस मनवितो

तारुण्य येतसे वेर्धक्य येत असे

आणि आपण आपले आयुष्य

हमखास जगायचेच विसरतसे...!!


खुप जगायचे स्वस्थ रहायचे

सुखाच्या जगाला नाही सोडायचे

काय मिळवलय काय गमवलय

शोधण्या कारण,आयुष्य नाही गमवायचे...!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational