शिक्षणाचा बाजार
शिक्षणाचा बाजार
1 min
802
शिक्षणाच्या नावाखाली
कोणी बाजार मांडला
शाळा शुल्कापायी इथे
श्वास मुलांचा कोंडला।।१।।
साऱ्या पुस्तका पुरत्या
नीती अनितीच्या कथा
मुले होती असंस्कारी
कुणालाही नाही व्यथा।।२।।
संधी साधू मतलबी
जमवती गोतावळा
हित स्वतःचे पाहण्या
उघडती इथे शाळा।।३।।
झाले महाग शिक्षण
माय बाप भांबावती
पोटी चिमटा घेऊन
पैसा पैसा जमवती।।४।।
विद्यार्थ्यांच्या भारंभार
पैसे खर्चाला लागती
आयुष्याची जमा पुंजी
संस्था चालक लाटती।।५।।