मी चंद्र शोधला होता
मी चंद्र शोधला होता
तुझ्या मनातले
कळावे तरी मला
नजरेत दोष होता
कि भास होत होता
कळा सोसल्या मी
वेदना होत होत्या
तु दिलेला घाव इतका
मी मनावर घेतला होता
मिटल्या पापणीतला
अंधार हसत होता
कवीतेच्या सोबतीने
मी संसार थाटला होता
नभातल्या चांदण्यात
मी चंद्र शोधला होता
आकाशी ढग दाटलेला
माझ्या वाटेत होता
तुझ्या जीवनातले
काही क्षण मिळावे मला
दुरावल्या क्षणातही
तु रोजचं भेटत होता.