कष्टाचे नाते...
कष्टाचे नाते...
1 min
312
महत्व मेहनतीचे
तुझ्या स्वप्नात आहे
महत्व कष्टाचे
तुझ्या जिद्दीत आहे
महत्व आकाशाचे
तुझ्या उडण्यात आहे
महत्व संस्काराचे
तुझ्या घडण्यात आहे
मानव म्हणुन जगताना
तुला बुद्धीचे वरदान आहे
म्हणून कष्टाशी नाते जपण्यात
तुझ्या यशाचे इमान आहे......