Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Abstract

2  

Abasaheb Mhaske

Abstract

मन

मन

1 min
6.9K


मन असते मनासारखे ...

आपल्याच मर्जीने वागणारे 

कुठल्याच चौकटीत न मावणारे  

पदरी बाळगते ते सदैव निखारे

मन असते मनासारखे ...

सदोदित स्वप्नात रमणारे 

इथे - तिथे भ्रमंती करणारे 

आपल्याच मस्तीत जगणारे

मन असते मनासारखे...

गुण - अवगुण , हेवेदावे 

राग, लोभ , मोह ,माया 

भावनिक गुंता बाळगणारे

मन असते मनासारखे ...

आपल्याच गुर्मीत वर्तुळाभोवती फिरणारे 

अन आपलेच जगणे नकोसे करणारे 

सैरभैर कधी अतंकीत होत जाणारे

मन असते मनासारखे ...

क्षणात खचते , कोलमडते  

क्षणात बावरते ,पुन्हा सावरते 

हसते- खेळते जगण्यास उभारी देते 

मन असते मनासारखे ...

सोज्वळ,पावन, सालस 

निर्मळ , प्रेमळ, क्षणिक हळवे  

अविरत माणूसपण जपणारे... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract