Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Vijay Sanap

Others

3  

Vijay Sanap

Others

वृद्धाश्रम

वृद्धाश्रम

1 min
14.4K


येता आठवण तुझी

डोळ्यात पाणी येते

आश्रमाच्या वाटेवर

बाळा वाट मी पहाते ।।

कधी येशील रे बाळा

मला तू घरी न्यावया

येई आठवण तुझी

माझी येडीच रे माया ।।

नको ठेऊ आश्रमात

भांडी कूंडी घाशीन मी

काही बोलो सून माझी

तरी सहन करीन रे मी ।।

पाणी पिठात टाकून

भूक तुझी भागवली

पोटी उपाशी राहून

रात सारी जागवली ।।

बाळा तुझ्यासाठी केला

तळहाताचा पाळणा

माझा दुष्काळाच्या काळी

होता आटला रे पान्हा ।।

बाप दुष्काळात गेला

घर दार सोडून वरती

छाया म्हणे असो तुझी

माझ्या गं बाळा वरती


Rate this content
Log in