प्रेमळ सहवास
प्रेमळ सहवास
1 min
7.2K
अंगात रग
मनात धग
जीवाला - जिवलग
भेटलाच पाहिजे
कामात दंग
सज्जनाची संग
जगण्यात उमंग
असलीच पाहिजे
नदीचा खळखळाट
पक्षांचा किलबिलाट
पानाची सळसळ
असलीच पाहिजे
पुनवेची रात
चांदण्याची बरसात
प्रेयसीच्या हातात हात
असलाच पाहिजे.
प्रेमाचा घास
जगण्याचा ध्यास
प्रेमळ सहवास
असलाच पाहिजे